कृषी मंत्री विमा कंपनीचे प्रतिनिधी आहेत का? भाजप आमदाराचा सरकारला घरचा आहेर

२०२० पासून राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विमा कंपन्यांची बाजू मांडत असल्याचा आरोप भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी केला.

Update: 2023-03-16 07:58 GMT

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा (Insurance to farmers) मिळाला नसल्याचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर कृषी मंत्री अब्दुल यांनी लवकरच टप्प्याटप्प्याने मदत देण्यात येईल, असं मत व्यक्त केलं. त्यानंतर भाजप (BJP) आमदार प्रवीण पोटे (Pravin Pote) यांनी थेट कृषी मंत्री विमा (Insurance) कंपन्यांचे प्रतिनिधी असल्यासारखे बोलत असल्याचं म्हटले. त्यावर कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी हा हेतुरोप चुकीचा असल्याचे म्हटले. तसेच मी ज्या विमा कंपन्यांनी हयगय केली असेल, त्या कंपन्यांवर कारवाई करू, असं म्हटले आहे. त्यामुळे प्रवीण पोटे यांचा आरोप चुकीचा असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले.

Tags:    

Similar News