सर्वोच्च न्यायालयाच्या युक्तिवादावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या युक्तीवादावर ठाकरे गटाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाच्यावतीने खासदार अनिल देसाई यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

Update: 2023-02-28 14:30 GMT

सर्वोच्च न्यायालयासमोर ( Supreme Court ) सुरु असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज तब्बल साडेतीन दिवसांनंतर ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांचा युक्तीवाद संपला. यानंतर आता शिंदे गटाच्या वकिलांनी युक्तीवाद करण्यास सुरवात केली. दिवसभर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला आणि आजची सुनावणी संपली. यावर ठाकरे गटाच्यावतीने खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रात सुरळीत चाललेले सरकार पाडण्याचे काम शिंदे-फडणवीस यांनी केले, आणि तिथे आपले सरकार स्थापन केले. असा आरोप ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार अनिल देसाई(Anil Desai) यांनी आज केला. गेल्या चार आठवड्यापासून राज्यातील सत्तासंघर्षांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court ) सुरु आहे. त्यावर अनिल देसाई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अभिषेक मनु सिंघवी यांनी ठाकरे गटाचे मुद्दे योग्यप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court ) पाडल्याचे देसाई यांनी सांगितले. ज्या १६ जणांना अपात्रतेची नोटीस देण्यात आली. त्याचवेळी सरकार पाडण्याच्या खेळाला सुरवात झाली होती, अशी माहीत देसाई यांनी दिली.

राज्यपालांनी त्यांची भूमिका योग्य प्रकारे निभावली नसल्याचा आरोप सुद्धा देसाई यांनी यावेळी केला. आणि त्यामुळे शिंदे-फडणवीस यांना जे पाहिजे होते ते करता आल्याचा आरोप देसाई यांनी केला. सर्व धोके न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचे काम अभिषेक मनु संघवी यांनी केल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी कोणतेही कार्य करु नये, अशा स्पष्ट सुचना दिल्याचे देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गेल्या चार आठवड्यापासून सुरु असलेली सुनावणी आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. मात्र १७ मार्च पर्यत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडून आज देण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार अनिल देसाई ( Anil Desai ) यांनी दिली. 

Tags:    

Similar News