अरे बापरे अमित शाह हे काय बोलून गेले?

Update: 2021-12-17 12:36 GMT

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांपुढे मोदी सरकारने माघार घेतली. जनहितासाठी ही माघार घेतल्याचे सांगत मोदी सरकारने आपला मोठा निर्णय रद्द केला. शेतकऱ्यांना समजावण्यात आपण कमी पडलो असे सांगत मोदींनी कायदे मागे घेतले असल्याचे सांगितले. ही घटना ताजी असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू साथीदार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठे विधान केले आहे. मोदी सरकारचे काही निर्णय चुकले असतील पण त्यामागे सरकारची भावना मात्र प्रामाणिक होती असे विधान अमित शाह यांनी केले आहे. FICCIच्या (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या) ९४ व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. २०१४ पूर्वी तत्कालीन सरकारमुळे जनतेच्या मनात लोकशाहीबद्दल साशंकता निर्माण झाली होती, पण मोदी सरकारमुळे देशातील १३० कोटी जनतेचा लोकशाहीवरील विश्वास अजून वाढला आहे हे मोदी सरकारचे सगळ्यात मोटे यश आहे, असे त्यांनी म्हटल आहे.

मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात अनेक निर्णय घेतली, त्यातील काही निर्णय चुकीचे असतील, पण त्या निर्णयांमागची भावना चुकीची नव्हती. मोदी सरकारचे टीकाकारही मान्य करतील की गेल्या सात वर्षात देशात खूप मोठे बदल झाले पण सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. सर्व संबंधितांशी सल्लामसलत करुनच सुधारणांबाबत निर्णय़ घेतले गेले, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे. मोदी सरकारचे काही निर्णय चुकले असतील अशी जाहीर कबुली सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाच्या नेत्याने पहिल्यांदाच दिली आहे.

Tags:    

Similar News