जेएसडब्ल्यू सोबत राज्य सरकारची ३५ हजार कोटींची गुंतवणुक

कोविड काळात मंदावलेली अर्थव्यवस्था आणि गुंतवणुकीला आता पुन्हा एकदा अनलॉकमधे गती मिळाली आहे.जेएसड्ब्लू कंपनीने राज्य शासनासोबत सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील भिवली धरणावर सुमारे दीड हजार मेगा वॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प सुरू केला जाणार आहे.

Update: 2021-09-15 03:54 GMT

जेएएडब्ल्यू आणि राज्य सरकार सोबतच्या कराराअंतर्गत इगतपुरी येथील जलविद्युत प्रकल्पासाठी साडे पाच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाच हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे. त्यासोबतच कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव आणि सातारा जिल्ह्यात सुमारे ५ हजार मेगा वॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प सुरू होणार आहे. १८७९ हेक्टर जागेवर हा प्रकल्प असेल. यामध्ये सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.



 

दोन्ही सामंजस्य करारांमुळे हजारोंच्या संख्येने रोजगार निर्मिती होईल. त्यामुळे प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासन या कंपनीला निश्चितच सर्व प्रकारचे सहकार्य करेल. यावेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन तसेच जेएसडब्लू कंपनीचे सहसंचालक प्रशांत जैन, बिजनेस हेड अभय याज्ञिक, प्रविण पुरी आदी मान्यवर उपस्थित होते.



 


Tags:    

Similar News