Adani ला मोठा झटका; fPOचे पैसे गुंतवणूकदारांना परत करणार

हिंडरबर्ग X अदानी वादामधे आज अदानीला जोरदार फटका बसला.गुंतवणूकदारांचे पैसै परत करण्यासाठी अदानी एंटरप्रायझेसने एफपीओ बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Update: 2023-02-01 18:41 GMT

हिंडररबर्ग X अदानी वादामधे आज अदानीला जोरदार फटका बसला.गुंतवणूकदारांचे पैसै परत करण्यासाठी अदानी एंटरप्रायझेसने एफपीओ बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Live : Adani ला मोठा झटका; FPO चे पैसे गुंतवणूकदारांना परत करणार

#AdaniGroup #Adani #Hindenberg #AdaniIPO

Posted by Max Maharashtra on Wednesday, 1 February 2023

याबाबत अदानी समुहानं परिपत्रक जारी केले आहे. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. पूर्ण झालेले व्यवहार माघारी घेत आपल्या गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेत एफपीओ मागे घेत असल्याचं अदानी समुहानं परिपत्रकात सांगितलं आहे.

अदानी समुहानं नुकताच अदानी एंटरप्राइजेज (Adani Enterprises) याचा FPO जारी केला होता. 31 जानेवारीपर्यंत गुंतवणूकधारकांना पैसे गुंतवण्याची संधी दिली होती. पण कंपनीनं एफपीओ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या संचालक मंडळाची आज बैठक झाली,

कंपनीमधील सदस्यांच्या हितासाठी एफपीओ बंद करण्याचा निर्णय घेतला. अदानी समुहाकडून गुंतवणूकधारकांना पैसे माघारी दिले जाणार आहे.

सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत अदानी समुहानं एफपीओची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्ण झालेले व्यवहार माघारी घेत आपल्या गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेत एफपीओ मागे घेत असल्याचं कंपनीनं आपल्या परिपत्रकात म्हटलेय.

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर कंपनीच्या समभागाची रक्कम ऑफर प्राईजच्याही खाली गेल्याचं बघायला मिळालं होतं. बजेटच्या दिवशीच म्हणजे आज अदानी एन्टरप्राझेजचा शेअर 28 टक्क्यांनी गडगडला होता. गुंतवणूकदारांच्या हितार्थ हा निर्णय घेत असल्याचं अदानींचं म्हणणं आहे.

20 हजार कोटींचा एफपीओ अदानी समुहानं बाजारात आणला होता. 27 जानेवारी ते 31 जानेवारीदरम्यान हा एफपीओ खुला होता. पण एक फेब्रुवारी रोजी बजेटच्याच दिवशी शेअरमार्केटमध्ये अदानी समुहाच्या शेअर्समध्ये पडझड झाली. आज अदानी एन्टरप्राझेजचा शेअर 28 टक्क्यांनी गडगडला होता. त्यामुळे अदानी समुहानं एफपीओ माघारी घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गुंतवणूकधरांचा एक ना एक रुपया परत करु, असे अदानी समुहानं परिपत्रका काढत सांगितलं आहे.

संसदेमध्ये आज अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर उद्यापासून संसदेमध्ये अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होणार आहे यामध्ये आदानी समूहाच्या व्यवहारांवर निश्चितपणे प्रश्न उपस्थित राहणार आहेत.




Tags:    

Similar News