Home > Top News > अमेरिका आणि चीनमधला संघर्ष वाढला, ट्रम्प यांचा आणखी एक इशारा

अमेरिका आणि चीनमधला संघर्ष वाढला, ट्रम्प यांचा आणखी एक इशारा

अमेरिका आणि चीनमधला संघर्ष वाढला, ट्रम्प यांचा आणखी एक इशारा
X

कोरोनाच्या उद्रेकानंतर अमेरिका आणि चीनमधला संघर्ष दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. चीनचे ह्यूस्टन, टेक्सास इथले दुतावास बंद करण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिल्यानंतर यापैकी एका दुतावासात काही कागदपत्रे जाळण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

यानंतर ट्रम्प यांनी चीनचे अमेरिकेतील आणखी काही राजनयिक उपक्रम बंद करण्याचा इशारा दिला आहे. या माध्यमातून चीनने गेली अनेक वर्षे हेरगिरी केली आणि अमेरिकेतील तंत्रज्ञान चोरल्याचा आऱोप डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान मंगळवारी दोन चीनी संगणक अभियंत्यांना जगभरात कोरोनावरील लसीचे संशोधन करणाऱ्या कंपन्यांमधील माहिती चोरल्याच्या आरोपाखाली अमेरिकेत अटक करण्यात आली आहे.

ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणातील भारत महत्त्वाचा सहकारी– अमेरिका

भारत हा अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातील उद्योन्मुख भागीदार आहे, तसंच डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणातील भारत हा मोठा आधारस्तंभ असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर येत्या G- 7 परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा..

चिनी वस्तूंवर आयातकर वाढवणे – फायदा कुणाचा?

कोरोना लस निर्मितीचा प्रवास: Saniya Bhalerao

Fact Check: कोरोना वाफेनं बरा होतो का?

‘इंडिया आयडियाज समिट’दरम्यान पॉम्पिओ बोलत होते. एवढेच नाही तर चीनमधून बाहेर पडणाऱ्या आरोग्य साहित्य आणि टेलिकॉम क्षेत्रातील उत्पादक कंपन्यांना आपल्याकडे खेचून घेण्याची भारताला संधी आहे, भारताने जगभरातील अनेक देशांचा विश्वास जिंकला आहे असंही पॉम्पिओ म्हणाले आहेत.

Updated : 23 July 2020 2:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top