Home > Top News > #कोरोनाशी_लढा - होमिओपॅथी,आयुर्वेद, युनानी औषधांबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना

#कोरोनाशी_लढा - होमिओपॅथी,आयुर्वेद, युनानी औषधांबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना

#कोरोनाशी_लढा - होमिओपॅथी,आयुर्वेद, युनानी औषधांबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना
X

कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी,आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शक सूचना तयार करुन टास्क फोर्सकडे द्याव्यात, त्यामुळे एकात्मिक औषधोपचार करुन रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी बुधवारी राज्यातील विविध पॅथींचे तज्ज्ञ आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुष उपचारासाठीच्या समितीचे अध्यक्ष डॉ. तात्याराव लहाने, मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, निमा, आय एम ए, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा..

Covid19: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर

कोरोना लस निर्मितीचा प्रवास: Saniya Bhalerao

सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आयुषच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी देखील राज्य सरकारने समिती नेमली आहे. उपचारांमध्ये सर्व पॅथी महत्त्वाच्या असून त्यातील औषधांसाठी सर्वांनी मिळून राज्य सरकारला दोन पानी मार्गदर्शक सूचना तयार करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Ayurvedic, Yunani and homeopathy guidelines to fight against covid-19

आयुषमधील औषधांची प्रतिबंधात्मक आणि उपचारासाठी अशा दोन भागात विभागणी करून तज्ज्ञांनी त्या संबंधी चर्चा करावी आणि टास्क फोर्सकडे सर्वसमावेशक सूचना सादर कराव्यात जेणे करून त्या कोरोना रुग्णांच्या उपचारात उपयुक्त ठरतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या संकटकाळात आर्युवेद, युनानी यांचे महत्त्व जगाला पटवून देण्याची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Updated : 23 July 2020 1:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top