लॉकडाऊनच्या काळात कोट्यवधींची अवैध दारु जप्त

Courtesy : Social Media

राज्यात लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर दुकानांवर झालेल्या गर्दीमुळे सरकारने घरपोच मद्यसेवा सुरू केली आहे. राज्यात १५ ते ३० मे या काळात ६ लाख ४ हजार ६८३ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आली आहे. तर शनिवारी दिवसभरात ५२ हजार ८६ ग्राहकांना घरपोच मद्यसेवा पुरवण्यात आली आहे. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ३१ हजार ४८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.

हे ही वाचा…


जागतिक पातळीवर भारताचे महत्त्व वाढणार, ट्रम्प यांचे संकेत

मोदी सरकारच्या १ वर्षातील निर्णयांचा अर्थ काय?

मोदी सरकारचं यश आणि अपयश

कोरोना रोखण्याचा ‘मुंढे पॅटर्न’!

मोदी 2.0 एक वर्ष पुर्ण, पाहा काय झाले देशाचे हाल?

राज्यात ७ हजार १८७ मद्यविक्री दुकाने सुरू असून १ मेपासून १ लाख २ हजार ७१२ ग्राहकांना मद्यसेवन परवाने मंजूर करण्यात आले आहेत. अवैध मद्य विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत ६ हजार ७९१ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून ३१४६ आरोपींना अटक झाली आहे, तर १७ कोटी ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.