Home > News Update > जागतिक पातळीवर भारताचे महत्त्व वाढणार, ट्रम्प यांचे संकेत

जागतिक पातळीवर भारताचे महत्त्व वाढणार, ट्रम्प यांचे संकेत

जागतिक पातळीवर भारताचे महत्त्व वाढणार, ट्रम्प यांचे संकेत
X

कोरोनाच्या फैलावाला जबाबदार ठरवत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी जागतिक आरोग्य संघटनेशी सर्व संबंध तोडून टाकले आहेत. तर चीनला धडा शिकवण्यासाठी त्यांनी नवीन निर्बंध लादले आहेत. पण जागतिक राजकारणातही बदल घडवून आणण्यासाठी ट्रम्प यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

जूनच्या अखेरीस नियोजित असलेली G-7 राष्ट्रांची बैठक डोनाल्ड ट्रम्प यांनी सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. G-7 संकल्पना आता कालबाह्य झाली आहे, असे मला वाटते असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जगात जे सुरू आहे त्याचे प्रतिनिधीत्व ही संघटना नीट करु शकत नाही असंही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा...


मोदी सरकारच्या १ वर्षातील निर्णयांचा अर्थ काय?

मोदी सरकारचं यश आणि अपयश

कोरोना रोखण्याचा ‘मुंढे पॅटर्न’!

मोदी 2.0 एक वर्ष पुर्ण, पाहा काय झाले देशाचे हाल?

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान, कॅनडा आणि इटली या देशांचा संघटनेत समावेश आहे. पण आता यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण कोरिया या देशांचा समावेश करणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Updated : 31 May 2020 1:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top