राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांवर

26

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. प्रमाण (Recovery Rate) 68.33 टक्के एवढे झाले आहे. सोमवारी राज्यात 6 हजार 711 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 58 हजार 421 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

पण सोमवारी राज्यात 9 हजार 181 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात सध्या 1 लाख 47 हजार 735 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान मुंबई आणि ठाण्यात एक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. पण पुण्यात अजूनही एक्टिव्ह रुग्णांची संख्या 40 हजारांच्या वर आहे.

हे ही वाचा…

मराठा आरक्षणाविरोधात भाजपचे राजकीय षडयंत्र : अशोक चव्हाण

“जंग फिर भी बाकी हैं…”

अंधारातले दिवे…. !!

मुंबईत एका दिवसात 925 रुग्ण आढळले आहेत आणि 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ठाणे शहरात एका दिवसात 160 नवीन रुग्ण आढळले असून 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे शहरात 779 नवीन रुग्ण आढळले आहेत.

Comments