Top
Home > News Update > भंडारा जिल्ह्यात 4 दिवसांपासून एकही नवा रुग्ण नाही, काय आहे भंडारा जिल्ह्याचं मिशन कोरोना?

भंडारा जिल्ह्यात 4 दिवसांपासून एकही नवा रुग्ण नाही, काय आहे भंडारा जिल्ह्याचं मिशन कोरोना?

भंडारा जिल्ह्यात 4 दिवसांपासून एकही नवा रुग्ण नाही, काय आहे भंडारा जिल्ह्याचं मिशन कोरोना?
X

ग्रामीण भागात काही जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. भंडारा जिल्ह्यात आज 2 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून गेल्या चार दिवसात कोरोनाचा नवा रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 77 आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 51 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आता 26 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 77 एव्हढी आहे.

आतापर्यंत 3822 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.त्यापैकी आतापर्यंत 77 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 3624 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 121 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.

हे ही वाचा..

मृत्यूदर कमी करण्यासाठी अँटीजेन टेस्टचा वापर, काय आहे ही टेस्ट?

कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या ‘या’ जिल्ह्यात आढळले कोरोना चे रुग्ण

एकाच दिवशी ४१६१ रुग्ण कोरोना मुक्त, मुंबईत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे

आज 24 जून रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 32 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 438 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 395 भरती आहेत. 2907 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे, मुंबई व इतर राज्यातून 43616 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 39087 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 4529 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

Updated : 25 Jun 2020 4:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top