Home > News Update > मृत्यूदर कमी करण्यासाठी अँटीजेन टेस्टचा वापर, काय आहे ही टेस्ट?

मृत्यूदर कमी करण्यासाठी अँटीजेन टेस्टचा वापर, काय आहे ही टेस्ट?

मृत्यूदर कमी करण्यासाठी अँटीजेन टेस्टचा वापर, काय आहे ही टेस्ट?
X

कोरोना विषाणूने बाधित होणाऱ्या व्यक्तींची संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी नव्या अँटीजेन टेस्टचा वापर करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज येथे केल्या.

डी.म्हैसेकर यांनी सांगितले की, शहराच्या दाट लोकवस्तीच्या भागातील नागरिकांची अँटीजेन टेस्ट करा. या चाचणीमुळे कोरोनाची बाधा झाल्याचे अर्ध्या तासात कळते. त्यामुळे बाधा झालेल्या पण लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणे असलेल्या नागरिकांना वेगळे काढता येईल आणि त्यांच्यावर उपचार करणे शक्य होईल.

शहरातील एकूण 15 प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी सहा आरोग्य केंद्राच्या अखत्यारित मृत्यूदर जास्त आहेत. या सहा प्राथमिक आरोग्य केंद्रावरच आता जादा लक्ष दिले जाईल, असे म्हैसेकर यांनी सांगितले. त्यांनी कोविड केअर सेंटरची क्षमता वाढवा म्हणुनही सांगितले. खाजगी दवाखान्यात नियंत्रित दरानेच आकारणी केली जाते का असे यावर लक्ष द्या. डॅशबोर्डवर कोरोना बाधित, आयसोलेशन, क्वारंटाईन कक्षात ठेवलेले रुग्ण अथवा मृत्यू झालेले रुग्णांची माहिती अचूक करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

हे ही वाचा..

कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या ‘या’ जिल्ह्यात आढळले कोरोना चे रुग्ण

मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र, परीक्षांबाबत हस्तक्षेपाची मागणी…

केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक, देशव्यापी आंदोलनाची हाक

बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.मंजिरी कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, अनिल कारंडे, महिला बाल विकास अधिकारी विजय खोमणे, सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंचल पाटील, परमेश्वर राऊत आदी उपस्थित होते

Updated : 25 Jun 2020 4:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top