Home > News Update > कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या 'या' जिल्ह्यात आढळले कोरोना चे रुग्ण

कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या 'या' जिल्ह्यात आढळले कोरोना चे रुग्ण

कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या या जिल्ह्यात आढळले कोरोना चे रुग्ण
X

कोरोना मुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सहा दिवसानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळून आले आहे.हे रुग्ण नुकतेच आखातातील कतार या देशातून जिल्ह्यात दाखल झाले आहे.दोन्ही रुग्ण हे तिरोडा तालुक्यातील असून रोजगारासाठी ते कतारमध्ये गेले होते.

विशेष म्हणजे 14 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने आज 24 जून रोजी त्यांना सुट्टी देण्यात आली.हे रुग्ण तिरोडा तालुक्यातील असून ते 30 ते 50 वर्षे वयोगटातील आहे.

आज ज्या दोन रुग्णांचा बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे,ते रुग्ण जिल्ह्यात दाखल होताच त्यांना गोंदिया येथे संस्थात्मक विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते. हे दोन्ही रुग्ण तिरोडा तालुक्यातील असून ते 20 ते 40 वर्ष वयोगटातील आहे. या रुग्णांचे विलगिकरण कक्षातून त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले होते. यामध्ये त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले.दोन्ही रुग्ण जिल्ह्यात इतर कोणाच्या संपर्कात न आल्यामुळे कोणीतीही व्यक्ती त्यांच्यामुळे बाधित झालेली नाही.

सलग सहा दिवसापर्यंत नवा कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून आलेला नव्हता.आज दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.अद्यापही 87 अहवाल प्रयोगशाळेत प्रलंबित आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात 104 कोरोना बाधित रुग्ण आढळले. 86 रुग्ण हे आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात क्रियाशील कोरोना रुग्णांची संख्या आता 18 इतकी आहे.

जिल्ह्यात आढळलेले 104 कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी/मोरगाव तालुका - 31,सडक/अर्जुनी तालुका - 10, गोरेगाव तालुका - 4, आमगाव तालुका -1, सालेकसा तालुका - 2, गोंदिया तालुका - 22 आणि तिरोडा तालुक्यातील 34 रुग्ण आहे.

विषाणू चाचणी प्रयोगशाळेत कोरोना संशयित 2129 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये 104 रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले.87 नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेत अद्यापही प्रलंबित आहे.आतापर्यंत 86 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहे.

जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 749 आणि घरी 1909 अशा एकूण 2658 व्यक्ती विलगीकरणात आहे.

आज 24 जून रोजी जिल्ह्यातील चोवीस कंटेंटमेंट झोनपैकी सालेकसा तालुक्यातील बामणी हे झोन वगळता उर्वरित 23 कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांना उपलब्ध सेवामध्ये शिथीलता देण्याची कार्यवाही करण्यात आली.

Updated : 25 Jun 2020 3:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top