एका ट्विटमुळे डोनाल्ड ट्रम्प झाले पुन्हा ट्रोल !

Netizens criticised us president Donald Trump troll over use of hydroxycloriquine for covid19 treatment

कोरोनावरील उपचारात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या गोळ्या उपयुक्त ठरत असल्यामुळे अनेक देश या गोळ्यांचा वापर करत आहेत. पण या गोळ्यांमुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने या गोळ्यांच्या रुग्णांवरील चाचण्या थांबवण्याचे आवाहन केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी एक ट्विट केले.

या ट्विटमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या गोळ्यांमुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे, असा निष्कर्ष हेनरी फोर्ड हेल्थ सिस्टमच्या अहवालातून काढण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेले आहे . त्यासोबतच ट्रम्प यांनी या अहवालाची अधिक माहितीही दिली आहे. ” 10 मार्च ते 2 मे या कालावधीमध्ये अडीच हजार रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यापैकी जेवढ्या रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या देण्यात आल्या, त्यात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण 13.4 टक्के आहे. तर ज्यांना या गोळ्या देण्यात आल्या नाही त्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण हे जवळपास 26.4 टक्के आहे” असेही ट्रम्प यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे ही वाचा..

या ट्रम्प यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आहेत. हेनरी फॉर्ड हेल्थ सिस्टमने जे सर्वेक्षण केलेले आहे. ते फक्त त्यांच्याकडे असलेल्या रुग्णांच्या अभ्यासातून केले आहे. त्यामुळे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन बाबतचा त्यांचा अहवाल हा अंतिम पुरावा मानता येऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया एका तज्ञ डॉक्टरांनी ट्रम्प यांच्या ट्विटवर दिलेली आहे. तर काहींनी ट्रम्प यांना या गोळ्यांच्या प्रसिद्धीमधून किती रुपये मिळत आहेत असा खोचक सवाल देखील विचारलेला आहे. पण याचवेळी काही जणांनी ट्रम्प यांच्या बाजूने प्रतिक्रिया देत हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यंबाबत चुकीची माहिती देणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here