Home > News Update > राज्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन, आणखी काय सुरू होणार?

राज्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन, आणखी काय सुरू होणार?

राज्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन, आणखी काय सुरू होणार?
X

केंद्र सरकारने लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवल्यानंतर राज्य सरकारनेही 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण मिशन बिगिन अगेन मोहिमे अंतर्गत सरकारने आधी परवानगी दिलेल्या व्यवहारांसोबत आता इतर काही अतिरिक्त व्यवहारांना परवानगी दिली आहे. तसंच काही मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला आहे. पण कंटेनमॉं झोनमध्ये मात्र लॉकड़ाऊनचे नियम कायम राहणार आहेत.

मिशन बिगिन अगेन, आणखी काय काय सुरू होणार?

1. मॉल्समधील दुकाने आणि रेस्टॉरंट्स सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार

2. मॉलमधील रेस्टॉरंट्स, फूड कोर्ट सुरू झाले तरी फक्त होम डिलिव्हरीची परवानगी

3. टीमची गरज नसलेल्या खेळांना परवानगी गोल्फ, बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब यासारख्या खेळांना परवनागी

हे ही वाचा...

सोन्याचे भाव 82 हजारांवर जाऊ शकतात का?

Unlock 3 चे नियम जाहीर, जिम सुरू होणार

नव्या शैक्षणिक धोरणाला केंद्राची मंजुरी, नवीन शैक्षणिक धोरणाचे ‘हे’ आहेत 11 मुद्दे

4. जिम, योगा क्लासेस सुरू होणार पण स्विमिंग पूल तूर्तास बंद राहणार

5. टू व्हिलरवर दोन जणांना परवानगी (फक्त अत्यावश्यक कारणासाठी)

6. रिक्षा – 1 + 2 (फक्त अत्यावश्यक कारणासाठी)

7. फोर व्हिलर – 1 + 3 (फक्त अत्यावश्यक कारणासाठी)

याशिवाय आधी ज्या व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे ते सुरूच राहणार आहेत. पण सर्व ठिकाणी मास्क तसंच सामाजिक अंतर राखणे बंधनकारक असणार आहे. पण यात रेल्वे आणि मेट्रो सेवा अजूनही बंद राहणार आहे. तर शाळा, कॉलेजेससुद्धा बंद राहणार आहेत. इतर सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी कायम आहे.

Updated : 30 July 2020 1:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top