Home > News Update > Unlock 3 चे नियम जाहीर, जिम सुरू होणार

Unlock 3 चे नियम जाहीर, जिम सुरू होणार

Unlock 3 चे नियम जाहीर, जिम सुरू होणार
X

केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक 3चे नियम जाहीर केलेले आहेत . यानुसार आता ५ ऑगस्टपासून जिम आणि योग क्लासेसला परवानगी देण्यात आलेली आहे. पण शाळा, कॉलेजेस आणि शैक्षणिक संस्थांना 31 ऑगस्टपर्यंत परवानगी नसेल हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मेट्रो आणि रेल्वे सेवा देखील अजून सुरू होऊ शकणार नाहीये. तसेच मॉल , सिनेमा थिएटर, बार यांना देखील अजूनही ही परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांना देखील अजून परवानगी देण्यात आलेली नाही. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाला देखील अजून पूर्णपणे परवानगी देण्यात आलेली नाही.

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून मार्चमध्ये सरकारने लॉक डाऊन जाहीर केले होते. त्यानंतर मे पासून हळूहळू लॉक डाऊन उठवण्यात आले. पण अजूनही पूर्णपण लॉकडाऊन उठवण्यात आलेले नाह. म्हणूनच सरकारने आता अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. अनलॉक पिन मध्ये काही सवलती देण्यात आल्या असल्या तरी कंटेनमेंट झोन'मध्ये मात्र लॉकडाउनचे नियम कायम राहणार आहेत.

केंद्राने अनलॉक 3चे नियम जरी जाहीर केले असले तरी राज्यांना तिथल्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची मुभा देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यांमध्ये लॉकडाउन उठवायचा की वाढवायचा याचा निर्णय तिथले राज्य सरकार घेऊ शकणार आहेत.

Updated : 29 July 2020 2:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top