Home > News Update > देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१ हजारांच्या वर

देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१ हजारांच्या वर

देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१ हजारांच्या वर
X

संपूर्ण जगात कोरोनाबाधीत रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या देशांच्या यादीत आता भारताने फ्रान्स आणि जर्मनीला मागे टाकले आहे. टॉप १० देशांच्या यादीत भारत आता सातव्या क्रमांकावर आहे. गेल्या २४ तासात कोरोनाबाधीत नवीन रुग्णांची संख्या ८ हजार ३९२ नोंदवली गेली आहे.

हे ही वाचा...


चीन चक्रव्युव्हात अडकला!

नरेंद्र मोदी : के भैया सब कुछ ऑल इज वेल है क्या? हेमंत देसाई

कोकण किनारपट्टीवर २ दिवसात वादळाचा इशारा

त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या १ लाख ९० हजार ५३५ झाली आहे. पण यातील ९१ हजार ८१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ हजार ३९४ आहे. त्यामुळे कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या ९३ हजार ३२२ कोरोनाबाधीत आहे. देशात कोरोनाबाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ४७ टक्क्यांच्यावर गेले आहे.

Updated : 1 Jun 2020 5:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top