कोकण किनारपट्टीवर २ दिवसात वादळाचा इशारा

20

येत्या दोन दिवसांत पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गपासून मुंबईपर्यंतच्या किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांनी काळजी घ्यावी आणि समुद्रात न जाण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. हे वादळ दिशाही बदलू शकते अशी शक्यता असली तरीही त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासनानेही किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर चक्रीवादळामुळे आपतकालिन परिस्थिती उद्भवल्यास खबरदारीच्या उपाययोजना करण्यासाठी सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत बैठक बोलावली आहे.

Comments