Home > News Update > #दिलासादायक- २४ तासात नवीन कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत थोडी घट

#दिलासादायक- २४ तासात नवीन कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत थोडी घट

#दिलासादायक- २४ तासात नवीन कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत थोडी घट
X

गेल्या महिनाभरापासून देशात कोरोनाबाधीतांची संख्या दररोज वेगाने वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी तर २४ तासातील आतापर्यंतची उच्चांकी संख्या ११ हजार ९२९ एवढी वाढली नोंदवली गेली होती. पण दोन दिवसांपासून ही संख्या किंचित कमी नोंदवली जात आहे.

गेल्या २४ तासात कोरोनाचे १० हजार ६६७ नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. तर ३८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी ११ हजार ५०२ रुग्ण आढळले होते. आज ही संख्या ९०० ने कमी झाली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४३ हजार ९१ आहे. तर मृतांची एकूण संख्या ९ हजार ९०० झाली आहे.

आतापर्यंत एकूण १ लाख ८० हजार १३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १ लाख ५३ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा...

रायगड जिल्ह्यात कोरोना विरोधातील लढाईचे सकारात्मक परिणाम

कोरोनामुळे भारतासह या ३ देशांमध्ये गरीबी वाढण्याची शक्यता

Updated : 16 Jun 2020 5:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top