Home > News Update > कोरोनामुळे भारतासह या ३ देशांमध्ये गरीबी वाढण्याची शक्यता

कोरोनामुळे भारतासह या ३ देशांमध्ये गरीबी वाढण्याची शक्यता

कोरोनामुळे भारतासह या ३ देशांमध्ये गरीबी वाढण्याची शक्यता
X

कोरोना महामारीने एप्रिलच्या मध्यापर्यंत संपूर्ण जग व्यापलं. पण तोपर्यंत युरोपीय देशांमध्ये पसरलेल्या या संकटामुळे जवळपास ४ ते ६ कोटी लोक अत्यंत गरीबीच्या परिस्थितीत ढकलले जातील असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला होता. पण हळूहळू हे संकट पसरत गेले आणि ज्या देशांमधील लोकांचे कमी आणि मध्यम उत्पन्न आहे तिथे मृतांची संख्या वाढत गेली.

या संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करुन आणि विकासदराबाबत व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजांनुसार

वर्ल्ड बँकेने दोन शक्यता गृहीत धरुन गरीबीबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

शक्यता - १ कोरोना प्रसाराचा वेग कायम राहिल्यास आणि या वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात सुधारणा झाली तर जागतिक विकासदर ५ टक्क्यांनी खाली येऊ शकतो.

शक्यता - २ कोरोनाचा प्रभाव दीर्घकाळ राहिला आणि कमी तसंच मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लॉकडाऊन वाढवावे लागले तर जागतिक विकासदर ८ टक्क्यांनी घसरु शकतो.

या दोन्ही शक्यतांचा विचार करता वर्ल्ड बँकेने ७ ते १० कोटी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जाण्याची भीती आहे.

वर्ल्ड बँकेच्या माहितीनुसार भारत, नायजेरिया आणि कांगो या देशांमध्ये जगातील गरीबांपैकी १ तृतीयांश गरीब राहतात. लॉकडाऊनमुळे या देशांच्या विकासदरात होणारी घट दारिद्र्य रेषेखालील गरिबांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरु शकते. त्याचबरोबर दक्षिण आशियामध्ये ४२ कोटी आणि सहारा देशांमध्ये ३९ कोटी लोक कोरोनामुळे गरिबीत ढकलले जाऊ शकतात, असा अंदाज वर्ल्ड बँकेने व्यक्त केला आहे. पण येत्या काळात कोरोनाचा प्रसार कसा होतो यावर हे अंदाज बदलू शकतात असंही वर्ल्ड बँकेने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर भारतातील गरिबांच्या संख्येबाबत २०११-१२ नंतर माहिती उपलब्ध नसल्याने कोरोनामुळे गरिबांची संख्या किती वाढली ते सांगणे कठीण असल्याचेही वर्ल्ड बँकेने म्हटले आहे.

Updated : 16 Jun 2020 3:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top