Top
Home > News Update > गृहनिर्माण सोसायट्यांना सहकारमंत्र्यांनी केल्या ‘या’ सूचना

गृहनिर्माण सोसायट्यांना सहकारमंत्र्यांनी केल्या ‘या’ सूचना

गृहनिर्माण सोसायट्यांना सहकारमंत्र्यांनी केल्या ‘या’ सूचना
X

लॉकडाऊनच्या काळात जनतेने रस्त्यावर न येता चांगला प्रतिसाद दिला. आज लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली असून काही गृहनिर्माण सोसायट्या अनावश्यक पणे काही निर्बंध लादत आहेत. तरी गृह निर्माण सोसायट्यांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

मुंबई, पुणे तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये मोठ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमध्ये वयोवृद्ध लोक राहतात. त्यांच्या घरी स्वयपाक करण्यासाठी बाहेरील महिला येतात त्यांना प्रवेश दिला जात नाही. तसेच दूध, भाजीपाला पुरवठा करणाऱ्यांना आणि कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना गृह निर्माण सोसायटी चेअरमन, संचालक मंडळ अनावश्यक पणे निर्बंध घालत आहे. तरी राज्यातील सर्व गृह निर्माण सोसायट्यांनी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असेही आवाहन सहकार मंत्री पाटील यांनी केले आहे.

हे ही वाचा

साने गुरुजींची आत्महत्त्या फक्त हारजीत या मोजपट्टीत बसवता येईल का?: प्रा. हरी नरके

२४ तासात कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येचा उच्चांक

“20 जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे का?”

Updated : 18 Jun 2020 4:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top