“20 जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे का?”

Shivsena mouth piece saamana criticises pm modi over clash between india and china
Courtesy: Social Media

सध्याच्या काळात सीमेवर युद्ध कुणालाही परवडणारे नाही, पण म्हणून २० जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे का असा सवाल सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आला आहे.

काय म्हटले या अग्रलेखात ते पाहूया…

मोदी पंतप्रधान झाल्यापासून देश अधिक मजबूत, खंबीर व लढाऊ बाण्याचा झाला, असे दावे सहा वर्षांत अनेकदा झाले, पण या काळात पाकिस्तान, नेपाळ व आता चीनने हिंदुस्थानवर सरळ हल्ला केला आहे. हिंदुस्थानच्या सीमेवरील एकाही राष्ट्राशी आपले सलोख्याचे संबंध नाहीत व आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघाले याचे आश्चर्य वाटते. नेपाळने हिंदुस्थानचा नकाशा कुरतडला आहे. पाकिस्तानची मस्ती र्सिजकल स्ट्राइकनंतरही कायम आहे. चीन तर एक फसवा आणि मायावी देश आहे, पण नेपाळही हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहात असेल, आव्हानाची भाषा करीत असेल तर जगाचा नेता, महासत्ता वगैरे होऊ पाहणाऱ्या आपल्या देशाची अवस्था बरी नाही हे मानावे लागेल.

हे ही वाचा..

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा आणखी एक मोठा विजय

चीनने मृत सैनिकांचा आकडा का लपवला?

Video: देश को गर्व होगा, ओ मारते मारते मरे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

ट्रम्प व चीन यांचे भांडण कोरोनाच्या प्रसारावरून लागले, पण अमेरिका चिनी क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येत नाही. आपला देश येतो व चीन आपले सीमेवरील शेजारी राष्ट्र आहे हे विसरता येत नाही. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, वाजपेयी यांनी धगधगत्या सीमा शांत ठेवण्याचा प्रयत्न केला तो यासाठीच. सीमेवरील संघर्षाची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागते. चीनबरोबर जो संघर्ष आज सुरू आहे त्याचे कूळ आणि मूळ पंडित नेहरूंच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणात आहे असे जाहीर सभांतून सांगितल्याने टाळ्या मिळतील, पण आज जवानांची बलिदाने सुरू आहेत ती थांबवण्याची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे.

पाकिस्तानला दम देणे, धमक्या आणि इशारे देणे, सर्जिकल स्ट्राइक करून राजकीय माहोल बनवणे सोपे आहे; कारण पाकिस्तान हा देश नसून टोळी आहे, पण चीनचे तसे नाही. अमेरिकेसारख्या मस्तवाल महासत्तेलाही न जुमानणाऱ्या चीनची स्वत:ची एक जागतिक फळी आहे. चीन साम्राज्यवादी आणि घुसखोर आहे. त्याने हिंदुस्थानवर आधीच अतिक्रमण केले आहे. लडाखच्या हिंदुस्थानी हद्दीत घुसून चीनने जो हल्ला केला तो एक इशारा आहे.

दिल्लीत बैठका आणि चर्चा सुरू आहेत. तणाव कोणालाच नको आहे. सध्याच्या काळात तो कोणालाच परवडणारा नाही, पण 20 जवानांचे बलिदान वाया जाऊ द्यायचे काय? प्रतिकार झालाच नाही तर मोदी यांच्या प्रतिमेस त्यामुळे धक्का बसेल.