Home > News Update > कोरोनावरील उपचारांसाठीच्या औषधांचा काळाबाजार, एक इंजेक्शन 60 हजारांना

कोरोनावरील उपचारांसाठीच्या औषधांचा काळाबाजार, एक इंजेक्शन 60 हजारांना

कोरोनावरील उपचारांसाठीच्या औषधांचा काळाबाजार, एक इंजेक्शन 60 हजारांना
X

कोरोना (corona)आजारावर उपचारासाठी वापर होणारी औषधांची मागणी व उपलब्धता यातील तफावतीमुळे त्याचा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने दखल घेत कारवाईला सुरूवात केली आहे. २३ जुलै अशीच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.

उल्हासनगर ३ मध्ये एक महिला अक्टरमा ४०० या औषधाची छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करीत असल्याचे समजताच ठाणे कार्यालयातील पथकाने कल्याण पोलिसांच्या मदतीने सापळा रचून निता पंजवानी रा. उल्हासनगर या महिलेला सिपला कंपनीचे टोलसीझुमब अक्टरमा ४००, इंजेक्शन ज्याची छापील किंमत रु ४०,५४५ आहे ते ६० हजार रुपयांना विक्री करताना पकडले आहे. हे औषधा डॉक्टरांच्या चिठ्ठीविना विकले जात होते तसेच तिच्याकडे परवाना नसताना विक्री सुरू होती.

हे ही वाचा...

राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 2 लाखांच्या जवळ

कोरोनाने धारावीचा रोजगार बदलला...

राम मंदिराच्या भूमिपुजनाला विरोध, याचिका कर्त्याच्या घराबाहेर भाजपची निदर्शन

भाजपानं संविधानाची सर्कस केली: रणदीप सुरजेवाला

या महिलेने औषध विक्री करताना रुग्णांचा कोविड अहवाल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन याची मागणीही केली नाही आणि पडताळणी केली नाही. या प्रकरणी भारतीय दंड संहिता, औषध व सौंदर्यप्रसाधने कायदे 1940 व जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ४ ठिकाणी कारवाई करून १५ लोकांना अटक केली आहे. औषधे छापील दरापेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास व औषधाचा काळा बाजार होत असल्यास या बाबतची माहिती टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ / ०२२- २६५९२३६२ या वर संपर्क साधावा असे आवाहन विभागाने केले आहे.

Updated : 25 July 2020 1:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top