Home > News Update > राम मंदिराच्या भूमिपुजनाला विरोध, याचिका कर्त्याच्या घराबाहेर भाजपची निदर्शन

राम मंदिराच्या भूमिपुजनाला विरोध, याचिका कर्त्याच्या घराबाहेर भाजपची निदर्शन

राम मंदिराच्या भूमिपुजनाला विरोध, याचिका कर्त्याच्या घराबाहेर भाजपची निदर्शन
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपुजन करणार आहेत. कोरोनाच्या महामारीत राम मंदिर भूमिपुजनाला गर्दी होऊ नये. म्हणून साकेत गोखले यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेसंदर्भात त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

त्यानंतर त्यांच्या घराबाहेर संघ कार्यकर्त्यांनी जय श्रीराम च्या घोषणा दिल्या. त्यांनी माझ्य़ा आईला धमकी धमकावलं. या संदर्भात त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात काही लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. तसंच साकेत गोखले यांना देखील संरक्षण देण्यात आल्याचं गोखले यांनी ट्विट करुन सांगितलं आहे.

या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे सर्व प्रकरण...

भाजप आणि त्यांचा प्रोपोगंडा चालवणारे चॅनल्स असं वातावरण तयार करत आहेत. की, मी अयोध्येच्या भूमिपुजना विरोधात कॉंग्रेसच्या सांगण्यावरुन याचिका दाखल केली आहे. भाजप पुन्हा एकदा मंदिराचं राजकारण खेळू पाहत आहे. अनलॉक 2 च्या गाइडलाईननुसार सर्व ठिकाणी जमावबंदी आहे. मग ती ईद असो की राम मंदीर...

व्हायरस तुमचा धर्म पाहात नाही. आता यामध्ये हा विषय नाही की, ज्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेतील. विषय आहे की ते कोणाला संक्रमीत करतील. विश्वास ठेवा महामारीच्या स्थितीतही भाजप धार्मिक राजकारण करत आहेत. ते देशातील कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालू शकत नाहीत.

कोणतीही गर्दी आता लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. मग ती ईदची असो अथवा राम मंदिराची ईद च्या उत्सवावर देखील बंधन नवीन लॉकडाउन चे नियम येण्यापुर्वीच बंधन घातली आहेत. मोदींनी Pm Cares मध्ये व्हेंटिलेटर घोटाळा केला. आता भाजप जातीयवादी राजकारण करु इच्छित आहे

हे ही वाचा

भाजपानं संविधानाची सर्कस केली: रणदीप सुरजेवाला

Independence Day 2020: यंदा असा साजरा करा स्वातंत्र्य दिन, केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी

गोखले यांनी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

दरम्यान गोखले यांनी गुरुवारी काही ट्विट करत महाराष्ट्र निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने भाजपाशी संबंधित कंपनीला नियुक्त केल्याचा आरोप केला होता. 2019च्या राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या आयटी सेलचे काम करणाऱ्या फर्मला निवडणूक आयोगाच्या सोशल मीडियाचे काम देण्यात आल्याचा गंभीर आरोप गोखले यांनी केला होता.

त्यानंतर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोग्याच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी दिली आहे. “साकेत गोखले यांनी केलेल्या ट्विटनंतर निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात सविस्तर अहवाल मागवला आहे”, अशी माहिती शरण यांनी दिली आहे.

त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या घटनेची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी विनंती देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून केली असल्याचं म्हटलं आहे.

Updated : 24 July 2020 7:01 PM GMT
Next Story
Share it
Top