Home > News Update > #coronavirus रिपोर्ट निगेटिव्ह आले म्हणून नियम मोडून जल्लोष, डॉक्टरांसह इतरांवर गुन्हा

#coronavirus रिपोर्ट निगेटिव्ह आले म्हणून नियम मोडून जल्लोष, डॉक्टरांसह इतरांवर गुन्हा

#coronavirus रिपोर्ट निगेटिव्ह आले म्हणून नियम मोडून जल्लोष, डॉक्टरांसह इतरांवर गुन्हा
X

कोरोनाचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरातील डॉ. देशपांडे यांनी हॉस्पिटलसमोर बॅन्ड , फटाके वाजवत , डान्स करून आनंद व्यक्त केल्याप्रकरणी त्यांच्यासह स्टाफ आणि बॅन्ड पथकावरदेखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

डॉ.देशपांडे हॉस्पिटलमध्ये एक कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाने तीन दिवस उपचार घेतले होते. या रुग्णाच्या संपर्कातील 58 जणांचे स्वॅब तपासणीत निगेटीव्ह आले आहेत.

हे ही वाचा...

राज्यातील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह, मंत्रिमंडळाची चिंता वाढली

ऑनलाईन मद्य खरेदी करत आहात? हा धोका लक्षात घ्या !

टाळेबंदीचा अतिरेक नको!

Exclusive Report #coronaeffect: राष्ट्रीय रंगमंच गाजवणारा कलाकार विकतोय भाजीपाला

त्यात डॉ. देशपांडे यांच्या हॉस्पिटलमधील स्टाफाही समावेश होता. परंतु रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर स्वतः डॉक्टर गजानन देशपांडे, त्यांचा मुलगा डॉ.श्रेयस देशपांडे, स्टाफमधील चेतन मिसाळ, अजय जाधव, प्रशांत भिसे, राहूल टाकणखार, अशोक घोडके, चेतन फुंदे, बालाजी क्षीरसागर यांच्यासह बॅन्जो पथकातील आठ ते नऊ जणांविरोधात काही वेळातच, माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 तसंच फटाके फोडल्याप्रकरणी 135 भादंविप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Updated : 12 Jun 2020 3:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top