Home > News Update > ऑनलाईन मद्य खरेदी करत आहात? हा धोका लक्षात घ्या !

ऑनलाईन मद्य खरेदी करत आहात? हा धोका लक्षात घ्या !

ऑनलाईन मद्य खरेदी करत आहात? हा धोका लक्षात घ्या !
X

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार आणि समाजकंटक ऑनलाईन व्यवहारांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात आतापर्यंत सायबर संदर्भात ४७० गुन्हे दाखल झाले असून २५५ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे.

सध्याच्या काळात , सरकारने ऑनलाईन मद्य खरेदीला आणि डिलिव्हरीला परवानगी दिली आहे .पण मद्य खरेदी करायचेच असल्यास सदर अँप किंवा वेबसाईट वापरण्यासाठी सुरक्षित आहे याची खात्री करा आणि मगच वापरा असे आवाहन सायबर विभागाने केले आहे. तसेच कुठल्याही अँपवर शक्यतो आपला बँक खात्याचा नंबर ,डेबिट /क्रेडिट कार्ड नंबर आणि त्यांचे पिन नंबर सेव्ह करू नका. शक्यतो cash on delivery चा पर्याय ऑर्डर बुक करताना निवडा असेही आवाहन सायबर विभागाने केले आहे. जर अशा वेबसाईट किंवा अँपवर तुम्ही फसवले गेले असाल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवा आणि www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण नोंदवा, असे आवाहनी महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

हे ही वाचा...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शरद पवारांच्या भेटीला…

टाळेबंदीचा अतिरेक नको!

Exclusive Report #coronaeffect: राष्ट्रीय रंगमंच गाजवणारा कलाकार विकतोय भाजीपाला

दरम्यान एकूण ४७० गुन्ह्यांची नोंद १० जून २०२० पर्यंत झाली आहे. यात आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९४ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १९१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ५० गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २५५ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .

पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील मंचर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यात आरोपीने परिसरातील एका डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे अशा आशयाचा मजकूर असणारी पोस्ट आपल्या व्हाट्सअँपद्वारे विविध व्हाट्सअँप ग्रुप्सवर शेअर केली होती . त्यामुळे परिसरात अफवा पसरून काही काळ संभ्रम निर्माण झाला होता, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

Updated : 12 Jun 2020 2:07 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top