Home > News Update > धनंजय मुंडे कोरोनामुक्त, जवळचे 'हे' दोन व्यक्ती अजुनही पॉझिटीव्ह

धनंजय मुंडे कोरोनामुक्त, जवळचे 'हे' दोन व्यक्ती अजुनही पॉझिटीव्ह

धनंजय मुंडे कोरोनामुक्त, जवळचे हे दोन व्यक्ती अजुनही पॉझिटीव्ह
X

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना आज दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयातून चार वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला. मुंडे यांना कोरोना ची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर या रुग्णालयात उपचार सुरु होते.

धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे 12 जून रोजी समोर आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

हे ही वाचा

भारत-चीन वाद: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला

आखिर कहना क्या चाहते हो…

महाराष्ट्रातील या विभागातून सर्वाधिक श्रमिक ट्रेन रवाना

मुंडे यांच्यासोबत करोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव तसेच आणखी एक स्वीय सहाय्यक दोन वाहन चालक एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली आहे .

आता केवळ एक अंगरक्षक व एक कुक हे दोघेच जण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती ही सुधारत आहे.

Updated : 22 Jun 2020 12:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top