Home > News Update > महाराष्ट्रातील या विभागातून सर्वाधिक श्रमिक ट्रेन रवाना

महाराष्ट्रातील या विभागातून सर्वाधिक श्रमिक ट्रेन रवाना

महाराष्ट्रातील या विभागातून सर्वाधिक श्रमिक ट्रेन रवाना
X

कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर याचा सर्वाधिक फटका बसला तो स्थलांतरित मजुरांना...यानंतर या मजुरांचे हाल होऊ नये आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात परत जाता यावे यासाठी सरकारने श्रमिक ट्रेन सुरू केल्या.

देशभरातून सोडण्यात आलेल्या या विशेष ट्रेनमधून उत्तर भारतातील बहुतांश स्थलांतरित मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यात परत जाता आलं. याच मोहिमेअंतर्गत पश्चिम रेल्वेने आतापर्यंत 1229 सेमी ट्रेन सोडलेल्या आहेत. या ट्रेनच्या माध्यमातून आतापर्यंत 18 लाख 50 हजार स्थलांतरित मजूर आपापल्या गावी परतले आहेत. यातील सर्वाधिक 700 ट्रेन या मुंबई विभागातून सोडण्यात आलेल्या आहेत,अशी माहिती पश्चिम रेल्वे तर्फे देण्यात आलेली आहे. मुंबईमधून अखेरची श्रमिक ट्रेन ही हावड्यासाठी शनिवारी सोडण्यात आली.

हे ही वाचा..

निकृष्ट बियाण्यांचे वाटप, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा तातडीने प्रतिसाद

…तर कोरोनाचा उद्रेक अटळ – तुकाराम मुंढे

लॉकडाऊनच्या काळात देशभरात सुमारे चार हजारांच्यावर श्रमिक ट्रेन चालवण्यात आलेल्या आहेत. या माध्यमातून साठ लाखांच्यावर स्थलांतरित मजूर हे आपापल्या राज्यांमध्ये परतले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही राज्यांनी स्थलांतरित मजुरांच्या ट्रेन येऊ देण्यास परवानगी दिली नव्हती. पण हळूहळू ही परवानगी देण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात मजूर हे आपापल्या राज्यांमध्ये परतले.

Updated : 22 Jun 2020 3:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top