Home > News Update > #कोरोनाशी_लढा- राज्यातील या जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त मृत्यूदर

#कोरोनाशी_लढा- राज्यातील या जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त मृत्यूदर

#कोरोनाशी_लढा- राज्यातील या जिल्ह्यात देशातील सगळ्यात जास्त मृत्यूदर
X

कोरोना विषाणूचा संसर्ग कसा रोखता येईल यासाठी केंद्रीय पथक राज्यातील विविध भागांमध्ये दौरा करत आहे. या पथकाने शनिवारी जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. कोरोनाबाधित रुग्णांचा सर्वाधिक मृत्यूदर हा जळगाव जिल्ह्यात असल्याने यावर नियंत्रण मिळवावे अशा सूचना केंद्रीय पथकाने इथल्या आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत.

दरम्यान सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचेही निरीक्षण या पथकाने नोंदवले. तसेच प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जावी, असे निर्देश केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. ए. जी. अलोने यांनी दिले. केंद्रीय पथकाने जळगाव कोविड रुग्णालय तसंच अतिशय गंभीर असलेल्या रुग्णांच्या वॉर्डलाही भेट दिली.

हे ही वाचा..

गोंदिया जिल्हा कोरोना मुक्तीकडे….

#कोरोनाशी_लढा- शिवभोजन थाळीनं भागवली लाखो लोकांची भूक

पुन्हा एकदा ‘हा’ जिल्हा कोरोनामुक्ती कडे

जळगाव कोविड रुग्णालयात कोरोना बाधीत महिलेचा आठ दिवस मृतदेह बाथरूममध्ये पडून असल्याचे आढळून आल्याने देशभर खळबळ उडाली होती. तसंच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सातत्याने वाढ तसंच सर्वाधिक मृत्युदर यामुळे केंद्रीय पथकाने दौरा केला केला. या दौऱ्याचा अहवाल केंद्र तसंच राज्यसरकरला देण्यात येणार आहे.

दरम्यान शनिवारी जळगाव जिल्ह्यात आणखी 75 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 149 पर्यंत पोहचली आहे. यातील 1339 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 646 रुग्ण सध्या उपचार घेत आहे , तर 164 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Updated : 21 Jun 2020 2:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top