Home > मॅक्स रिपोर्ट > पुन्हा एकदा ‘हा’ जिल्हा कोरोनामुक्ती कडे

पुन्हा एकदा ‘हा’ जिल्हा कोरोनामुक्ती कडे

पुन्हा एकदा ‘हा’ जिल्हा कोरोनामुक्ती कडे
X

गोंदिया:- कोरोना विषाणू बाधित एकही रुग्ण जिल्ह्यात आज 19 जून रोजी सलग दुसऱ्याही दिवशी आढळून आलेला नाही.12 ते 17 जून दरम्यान सलग सहा दिवसात 33 रुग्ण आढळून आले त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण होते.मात्र काल आणि आज या दोन्ही दिवशी एकही रुग्ण जिल्ह्यात आढळून न आल्यामुळे कोरोनाला ब्रेक लागला आहे.त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.

26 मार्चला एक रुग्ण,19 मे रोजी दोन रुग्ण, 21 मे रोजी सत्तावीस रुग्ण, 22 मे रोजी दहा रुग्ण, 24 मे रोजी चार रुग्ण, 25 मे रोजी चार रुग्ण, 26 मे रोजी एक रुग्ण, 27 मे रोजी एक रुग्ण, 28 मे रोजी नऊ रुग्ण, 29 मे तीन रुग्ण, 30 मे रोजी चार रुग्ण, 31 मे रोजी एक रुग्ण, 2 जून रोजी दोन रुग्ण,12 जून रोजी एक रुग्ण ,13 जून रोजी एक रुग्ण, 14 जून रोजी एक रुग्ण,15 जून रोजी चौदा रुग्ण,16 जून रोजी पंधरा रुग्ण आणि 17 जून रोजी एक रुग्ण असे 102 कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात आढळुन आले.

आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेले 102 कोरोना बाधित रुग्ण हे अर्जुनी/मोरगाव तालुका - 31,सडक/अर्जुनी तालुका - 10, गोरेगाव तालुका - 4, आमगाव तालुका -1, सालेकसा तालुका - 2, गोंदिया तालुका - 22 आणि तिरोडा तालुक्यातील 32 रुग्ण आहे.

विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी आतापर्यंत 1627 घशातील स्त्राव नमुने पाठविण्यात आले. त्यामध्ये 102 रुग्ण हे कोरोना बाधित आढळुन आले.101 नमुन्यांचा चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहे.

जिल्ह्यातील 69 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले .आज दुसऱ्या दिवशी एकही कोरोना बाधित रुग्ण आढळुन आलेला नाही. एकूण 102 कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात आहेत.त्यापैकी 33 रुग्ण क्रियाशील आहे.

जिल्ह्यातील विविध शाळा व संस्थांमध्ये 921 आणि घरी 1978 असे एकूण 2899 व्यक्ती अलगीकरणात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Updated : 19 Jun 2020 7:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top