Home > News Update > Badlapur : बदलापूर नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा

Badlapur : बदलापूर नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा

नगराध्यक्षपदावर रुचिता घोरपडे यांचा दणदणीत विजय

Badlapur : बदलापूर नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा
X

बदलापूर: बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवत नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांनी मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे.

ही लढत अत्यंत चुरशीची ठरली होती. बदलापूर शहरात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात थेट सामना रंगला होता. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. शिवसेना (शिंदे गट) कडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतली होती, तर भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती.

अखेर बदलापूरच्या मतदारांनी भाजपच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांना स्पष्ट कौल देत मोठ्या मताधिक्याने विजयी केले. या निकालानंतर बदलापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, शहरात जल्लोष साजरा केला जात आहे.

Updated : 21 Dec 2025 5:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top