Home > मॅक्स रिपोर्ट > Max Maharashtra Impact : ६ वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाईकवर नेला, विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित

Max Maharashtra Impact : ६ वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाईकवर नेला, विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित

Max Maharashtra Impact : ६ वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाईकवर नेला, विधानपरिषदेत मुद्दा उपस्थित
X

सामान्य जनतेचे प्रश्न मांडून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या मॅक्स महाराष्ट्रच्या बातमी आणखी एक मोठा इम्पॅक्ट झाला आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात एका ६ वर्षांच्या मुलाचा मृतदेह हॉस्पिटलमधून अँब्युलन्स न मिळाल्याने बाईकवर न्यावा लागल्याचा प्रकार घडला होता. मॅक्स महाराष्ट्रने महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही बातमी सर्वप्रथम दिली होती. त्यानंतर संबंधित सरकारी हॉस्पिटलमधील दोन अँम्ब्युलन्स चालकांना निलंबित करण्यात आले होते.



`त्या` घटनेला कुटीर रुग्णालयाचे डॉक्टरच जबाबदार ?

पालघरच्या पालकमंत्र्यांना पालकमंत्रीपदाचा विसर, जिल्ह्यातून संताप

पालकमंत्र्यांनी घोषणा केलेल्या त्या 86 रुग्णवाहिका कुठं आहेत..? विवेक पंडीत यांचा सवाल

MaxMaharashtraImpact : त्या दोन वाहन चालकांचे निलंबन, आणखी चार जणांवर होणार कारवाई

रुग्णवाहिका नाकारल्याने बाईकवरून न्यावा लागला चिमुकल्याचा मृतदेह


पण या प्रकरणात केवळ अँब्युलन्स चालक यांचा दोष नाही तर त्या शासकीय आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि नर्सेसही जबाबदार असल्याचे कुटुंबियांचा आणि निलंबित चालकांचे म्हणणे होते, त्याबाबतचे वृत्तही मॅक्स महाराष्ट्रने सतत पाठपुरावा करत असताना दिले होते. अखेर या गंभीर प्रकरणाचा विषय आमदार सुनिल शिंदे यांनी विधान परिषदेत मांडला, तसेच या प्रकरणी कठोर कारवाई आणि डॉक्टर तसेच नर्सेसशी चौकशी कऱण्याची मागणी केली. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टर आणि नर्स यांच्या पुन्हा चौकशी कऱण्याचे आश्वासन दिले आहे.


Updated : 27 March 2022 2:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top