Home > मॅक्स रिपोर्ट > पालघरच्या पालकमंत्र्यांना पालकमंत्रीपदाचा विसर, जिल्ह्यातून संताप

पालघरच्या पालकमंत्र्यांना पालकमंत्रीपदाचा विसर, जिल्ह्यातून संताप

पालघरच्या पालकमंत्र्यांना पालकमंत्रीपदाचा विसर, जिल्ह्यातून संताप
X

Palghar : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर कडाक्याच्या थंडीत सहा वर्षीय आदिवासी बालकाचा मृतदेह दुचाकीवरून न्यावा लागल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला. त्यानंतर आमदार सुनिल भुसारा यांनी पारधी कुटूंबियांची भेट घेतली. मात्र त्यानंतर अजूनही पालकमंत्री असलेले दादा भुसे यांनी मृत बालकाच्या कुटूंबियांची भेट न घेतल्याने त्यांना पालकत्वाचा विसर पडला आहे का? असा सवाल केला जात आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर जव्हार कुटीर रुग्णालयात सहा वर्षीय आदिवासी बालकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने असंवेदनशीलपणे उत्तर देत मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. त्यामुळे आदिवासी पारधी कुटूंबियांना कडाक्याच्या थंडीत चिमुकल्याचा मृतदेह दुचाकीवरून न्यावा लागला. त्यानंतर मॅक्स महाराष्ट्रने वृत्त प्रकाशित केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णवाहिका चालकांना निलंबित केले. त्यानंतर आमदार सुनिल भुसारा यांनी कुटूंबियांची भेट घेत पारधी कुटूंबियांचे सांत्वन केले. मात्र सहा दिवस उलटूनही पालकमंत्री दादा भुसे यांनी मृत बालकाच्या कुटूंबियांची भेट घेतली नाही. त्यावरून दादा भुसे यांना पालघर जिल्ह्याच्या पालकत्वाचा विसर पडला आहे का, असा प्रश्न करत संताप व्यक्त केला जात आहे.

घटना नेमकी काय.?

पहिलीत शिकणारा मृत्यू अजय युवराज पारधी वय 6 वर्ष ह्याला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. त्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला उपचारासाठी 24 तारखेला त्रिंबकेश्वर येथील दवाखान्यात नेले .परंतु तेथे एक दिवसाच्या उपचारानंतर डॉक्टरांनी अजय पारधी या बालकाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर चिमुकल्याला घेऊन युवराज पारधी मोखाडा ग्रामीण रुग्णलयात घेऊन गेले. परंतु त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी बालकाला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देत व बालकाला जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल करा, असे सांगितले. बालकाचे वडील युवराज पारधी यांनी अजयला जव्हार कुटीर रुग्णलयात दाखल केले. परंतु 25 तारखेला उपचारा दरम्यान रात्री 9:00 वाजता कुटीर रुग्णालयात बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर बालकाचा मृतदेह नेण्यासाठी वाहनाची सोय नव्हती. त्यामुळे आर्थिक चणचणीत असलेल्या या कुटूंबाला मृत्युदेह आता घरी न्यायचा कसा ? असा प्रश्न पडला. मात्र त्यानंतर कुटूंबियांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क केला. मात्र त्यांनी रुग्णवाहिका देण्यास नकार दिला. त्यामुळे रुग्णालयाच्या असंवेदनशीलतेवर प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णवाहिका चालकांवर कारवाई करण्यात आली.

पालकमंत्र्यांना पालकत्वाचा विसर....?

पालघर जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न, मच्छिमारांचे प्रश्न, कुपोषण, दारिद्य्र असे अनेक प्रश्न असताना पालकमंत्र्यांनी पालघर जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले आहे. तर पालकमंत्री अवघे स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने जिल्ह्यात फोटोसेशन करण्यासाठी येतात. मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांचे काम निराशाजनक आहे, असे सांगत मोखाडा तालुक्यातील पायरवाडीच्या पारधी कुटूंबातील चिमुकल्याच्या मृत्यूनंतर घडलेल्या असंवेदनशीलतेनंतरही पालकमंत्र्यांनी पारधी कुटूंबाची भेट न घेतल्याने पालकमंत्र्यांना जिल्ह्याच्या पालकत्वाचा विसर पडला आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Updated : 31 Jan 2022 11:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top