Home > मॅक्स रिपोर्ट > `त्या` घटनेला कुटीर रुग्णालयाचे डॉक्टरच जबाबदार ?

`त्या` घटनेला कुटीर रुग्णालयाचे डॉक्टरच जबाबदार ?

`त्या` घटनेला कुटीर रुग्णालयाचे डॉक्टरच  जबाबदार ?
X

जव्हारच्या कुटीर रुग्णालयात रुग्णवाहिका न मिळाल्याने अजय पारधी या 6 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यूदेह बाईकवर न्यावा लागल्याची दुर्दवी घटना मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथे घडली होती. या घटनेची सर्वप्रथम मॅक्समहाराष्ट्राने बातमी प्रसिद्ध करून जव्हारच्या कुटीर रुग्णालयाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला याची प्रशासन दखल घेऊन तीन वाहन चालकांना तात्काळ निलंबित करण्यात आले. परंतु या घटनेत आमचा दोष नाही डॉक्टरांच्या मनमानी कारभारामुळे हि दुर्दैवी घटना घडली आहे. परंतु होणाऱ्या कारवाई पासून वाचण्यासाठी नाहक आम्ही गरीब कंत्राटी वाहनचालकांचा बळी दिल्याचा आरोप त्या निलंबित कर्मचाऱ्यांनी केला आहे. या घटनेने आमची बदनामी झाली असल्याने याची उचस्थरीय चौकशी करून दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी मॅक्समहाराष्ट्राशी बोलताना केली आहे

यावेळी आम्ही वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड यांची दवाखान्यात जाऊन भेट घेतली असता या घटनेला वाहनचालकच जबाबदार असून त्यांनी कॅमेऱ्या समोर बोलण्यास नकार दिला.

Updated : 8 Feb 2022 1:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top