Home > Election 2020 > मॅक्समहाराष्ट्र इम्पॅक्ट : दाभोळ धान्य वितरणात घोटाळा, रेशन दुकानाचा परवाना रद्द...

मॅक्समहाराष्ट्र इम्पॅक्ट : दाभोळ धान्य वितरणात घोटाळा, रेशन दुकानाचा परवाना रद्द...

मॅक्समहाराष्ट्र इम्पॅक्ट : दाभोळ धान्य वितरणात घोटाळा, रेशन दुकानाचा परवाना रद्द...
X

करोनाकाळात सामान्य नागरिकांची हेळसांड होऊ नये म्हणून केंद्रासह राज्य सरकारने देखील विविध योजनांतर्गत धान्य वाटप करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, एकीकडे प्रशासन करोनाशी झुंजत असताना, काही धान्य वितरकांकडून मात्र सामन्यांची फसवणूक केली जात आहे. अशा दुकानदारांच्या शासनाने मुसक्या आवळायला घेतल्या असून दाभोळमध्ये संबंधित दुकानदारांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कोरोनाच्या या कठीण परिस्थितीत देखील काही रेशन दुकानदार काळाबाजार करत असल्याचे निर्देशनास येत आहेत. कोरोनाच्या आपत्ती काळात नागरिकांना अडचण होऊ नये म्हणून सरकारने रेशनकार्ड धारकांना कमी दरात रेशन उपलब्ध करुन दिलं. मात्र, काही रेशन दुकानदार या काळातही ग्राहकांची फसवणूक करताना आढळत आहेत. निश्चित दरापेक्षा जास्त दरात धान्य विक्री करणाऱ्या अशाच रेशन दुकानदारांवर (Lockdown Effect) कारवाई करण्यात आली आहे.

शासन आणि प्रशासन रेशनवर सर्वाना धान्य मिळेल असं बोललं असताना देखील दाभोळ गावात ऑनलाईन नोंदणी न केलेल्या रेशन कार्ड धारकांना धान्य दिले जात नसल्याची बाब दाभोळमध्ये समोर आली. दाभोळ रेशनिंग दुकानदाराबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. यासंदर्भात 'मॅक्स महाराष्ट्र'ने दाभोळमधील रेशनकार्ड ऑनलाईनच्या नावाखाली पुरवठा विभागाचा हा अनागोंदी कारभार 20 एप्रिलला उघडकीस आणला. सामान्यांच्या हक्कासाठी मॅक्समहाराष्ट्रने पाठपुरावा केला असता या सर्व काळाबाजारसंबंधी मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी तेजस बोरघरे यांनी वेळोवेळी दाभोळमध्ये ऑनलाईन रेशनकार्डच्या नावाखाली पुरवठा विभागाचा जो अनागोंदी कारभार सुरु होता याचे वृत्त दिले आहेत. यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात 943 रेशन दुकानं असून यामध्ये 2 रेशन दुकानांनवर कारवाई करण्यात आली होती.

https://youtu.be/ZB49_LecTho

अखेर आज (2 मे ) दाभोळ धान्य दुकान क्रमांक 1,2 ,3 जीवनावश्यक वस्तू कायदाअंतर्गत रेशनिंग दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईअंतर्गत दाभोळ धान्य दुकान क्रमांक 1,2,3 या दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. भारतीय दंड विधान (भा.द. वि) कलम 409 फसवणुकीचा उद्देश, कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा, तसेच कलम 34 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 कलम 3,7 अन्वये कलम लावण्यात आले आहेत. दरम्यान आरोपी अंजली माता स्वयं सहायता महिला बचत गट व्यवस्थापक विजय रामचंद्र बोरघरे आणि विक्रेती अस्मिता दिलीप पेवेकर यांच्यावर सदर कायदाअंतर्गत या दोघाविरुद्ध शुक्रवारी मध्यरात्री दाभोळ सागरी ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यामधील आरोपी विजय रामचंद्र बोरघरे आणि अस्मिता दिलीप पेवेकर यांनी एकमेकांच्या संगनमताने व सहाय्याने अंजनी माता स्वयं सहायता महिला बचत गट दाभोळ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या रास्ता धान्य दुकानातील धान्य वाटपाची कोणतीही परवानगी नसताना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना कार्डमधील नवीन नावे समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींना एप्रिल 2020 महिन्यातील मोफत धान्य वाटप केले नसून एकूण 9.44 क्विंटल (1 क्विंटल= 100 किलो प्रमाण 944 किलो ) तांदूळ व 5.15 क्विंटल गहू त्याचबरोबर मोफत तांदूळ 2.67 क्विंटल धान्याची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. तसेच मोफत तांदूळ 28.25 क्विंटल धान्याची फसवणूक झाली आहे. मोफत तांदूळ 28.25 क्विंटल रेशन धान्याचा घोटाळा झाला असून ही रक्कम एकूण 93,000 रुपये आहे. शासनाची फसवणूक केली असल्यामुळे सदर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या दाभोळ धान्य दुकान क्रमांक 1,2,3 यामधील दुकान 1 आणि 2 हे वौणौशी धान्य दुकानाच्या अखत्यारीत तर धान्य दुकान 3 हे भाटी धान्य दुकानाच्या अखत्यारीत (हलवलं) गेलं आहे.

संबंधित बातमीची लिंक –

दाभोळ रेशनकार्ड अनागोंदी कारभार प्रकरणी फौजदारी कारवाई करणार – नायब तहसीलदार

दाभोळमध्ये ऑनलाईन रेशनकार्डच्या नावाखाली पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार…

दाभोळ: रेशनकार्ड घोटाळ्यावर तहसिलदारांचं अखेर शिक्कामोर्तब, आता प्रतीक्षा कारवाईची…

रत्नागिरी जिल्ह्यात रेशन काळाबाजार करणाऱ्यांवर मोठी कारवाई…

या संदर्भात अधिक माहितीसाठी मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी तेजस बोरघरे यांनी रत्‍नागिरी जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांना भ्रमणवध्वनी केलं असता

"त्यांनी कारवाईचे निर्देश दापोलीचे तहसीलदार यांना दिले आहेत असं सांगितलं. दुकानाचे व्यवस्थापक आणि विक्रेते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक माहितीसाठी त्यांनी समीर घाडे यांच्याजवळ संपर्क साधण्यास सांगितलं."

या संदर्भात अधिक माहितीसाठी दापोली तहसीलदार समीर घाडे यांना भ्रमणवध्वनी केलं असता

"यांसंदर्भात संबंधीत व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. सदर दुकान ट्रान्सफर झाला आहे. यांसंदर्भात अधिक माहितीसाठी त्यांनी दाभोळ पोलिस स्टेशनला संपर्क करण्यास सांगितले."

या संदर्भात अधिक माहितीसाठी मॅक्समहाराष्ट्रचे प्रतिनिधी तेजस बोरघरे यांनी दाभोळ सागरी पोलीस ठाणे येथील साहय्यक पोलिस निरीक्षक अधिकारी सुनील पवार यांना भ्रमणवध्वनी केलं असता

" यांसंदर्भात गुन्हा रात्री उशिरा दाखल झाला आहे. सदर बाबतीचा अधिक तपास सुरु असून संबंधितांवर कारवाई करण्याचे काम सुरु आहे."

अशी माहिती साहय्यक पोलिस निरीक्षक अधिकारी सुनील पवार यांनी दिली आहे.

कोकण महसूल विभागात एकूण ९ गुन्हे नोंदविण्यात आले असून ७ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात २ रेशन दुकानांनवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे गुन्हा नोंदवला असून दुसरा गुन्हा चिपळूण तालुक्यातील कोंढे येथे नोंदवला आहे. तर तिसरा गुन्हा रत्‍नागिरी जिल्ह्यातील दाभोळ येथे दाखल झाला आहे.

Updated : 15 Feb 2021 6:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top