जीएसटी रिटर्न्स न भरणाऱ्यांची संपत्ती जप्त होऊ शकते का?

Update: 2019-12-27 14:35 GMT

जीएसटी रिटर्न्स न भरणाऱ्यांच्या बँक खातेदारांची मालमत्ता जप्त होणार का? असा सवाल अलिकडे उपस्थित केला जात आहे. कारण केंद्रीय अप्रत्यक्ष कर (सीबीआयसी) आणि सीमा शुल्क बोर्ड यांनी जारी केलेल्या एसओपी मध्ये जीएसटी आयुक्त केंद्रीय जीएसटी अधिनियम नुसार कलम 83 मध्ये या संदर्भात उल्लेख करण्यात आला आहे.

कलम 83 नुसार जीएसटी आयुक्त जीएसटी न भरणाऱ्याची संपत्ती जप्त करु शकतो. असं म्हटलं आहे. एका विशिष्ट कालावधीमधी जीएसटी रिटर्न न भरणाऱ्या खातेदारांचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाऊ शकतं. मात्र, हा कालावधी किती असेल? या संदर्भात अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही.

या कलमांतर्गत आयुक्त करदात्यांची त्याच्या बँक खात्यासह कोणतीही मालमत्ता जप्त करू शकतात. यासाठी, त्याला एका विशिष्ट फॉर्मवर ऑर्डर द्यावी लागेल, ज्यात ताब्यात घ्यायच्या मालमत्तेचा तपशील असेल.

त्यामुळे यापुढे ठराविक कालावधी पेक्षा जास्त वेळ जीएसटी भरला नाही. तर सरकार आता जीएसटी खातेदारांची मालमत्ता जप्त करु शकते. त्यामुळं जीएसटी खातेदारांनी आपला कर वेळेत भरणं गरजेचं आहे.

Similar News