विद्यार्थी निवडणुकांआधीच वाद शिगेला

Update: 2019-07-30 05:50 GMT

मुंबई विद्यापीठात तब्बल २५ वर्षांनंतर महाविद्यालयीन निवडणुका होणार आहेत. विविध अंगी-रंगी असलेल्या महाराष्ट्राच्या समाजिक-राजकीय परिस्थितिचे चित्र बदलण्यासाठी आशावादी असणाऱ्या तरुणाईला आजुबाजूची मळबट दूर सारून स्वतःचे नेतृत्व गुण सिद्ध करण्यासाठीची ही ‘ महाविद्यालयीन निवडणुक हे निश्चित. यातूनच पुढे भारतीय लोकशाहीला बळकट करणारे मतदार आणि नेतृत्व मिळेल.

दरम्यान, निवडणुका म्हणजे हेवे-दावे होणारच. २५ वर्षांच्या कालावधी नंतर होणारी निवडणुक सर्वांसाठीच नवखी आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यी संघटनांनी आपली रणनीती आखली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नावनोंदणीची मोहीम हाती घेतल्यामुळे इतर संघटनेने यावर आक्षेप घेतले आहे. त्यामुळे निवडणूक होण्याआधीच वाद निर्माण होत आहेत. मात्र, अभाविपने विविध विद्यार्थी संघटनेच्या विरोध हा त्यांच्या स्वार्थासाठी केलेला स्टंट आहे असे अभाविपने स्पष्ट केले आहे.

Similar News