महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी २६ मार्चला निवडणूक

Update: 2020-02-29 07:18 GMT

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात रिक्त जागांसाठी निवडणूकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. शरद पवार यांच्यासह माजी मंत्री फौजीया खान यांची उमेदवारी राष्ट्रवादीनं जाहीर केली आहे. भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव निश्चित आहे. मात्र, शिवसेना आणि काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची नावं अजूनही जाहीर केली नाहीत.

पुढील महिन्यात २६ मार्च रोजी राज्यसभेची निवडणूक पार पडणार असून याचं दिवशी निवडणूकीचा निकालही जाहीर होणार आहे. राज्यसभेतील एकूण १७ राज्यातील ५५ सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपत आहे. त्यातील महाराष्ट्रातील राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे.

येत्या 6 मार्चला निवडणुकीचा अधिसूचना जारी होणार असून १३ मार्चला उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. १६ मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. १८ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. तर २६ मार्चला सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान मतदान पार पडेल आणि त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

Similar News