पाकिस्तान चे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ ला फाशीची शिक्षा

Update: 2019-12-26 05:26 GMT

पाकिस्तान चे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना एका विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान परवेज मुशर्रफ सध्या विदेशात आहेत. मुशर्रफ काही काळ पाक सेनेचे लष्कर प्रमुख देखील राहिलेले आहेत. नवाझ शरीफ यांचं सरकार पाडून त्यांनी सत्तेची सूत्र स्वत:च्या हातात घेतली होती. या संदर्भात पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्राने हे वृत्त प्रसारीत केलं आहे.

त्यांच्या 3 डिसेंबर, 2007 पासून लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार पाडण्याचा आरोप ठेवत, राजद्रोहाचा खटला त्यांच्या विरोधात सुरु होता. त्यांना एका विशेष न्यायालयाने 3 मार्च 2014 ला या प्रकरणी दोषी ठरवलं होतं. मुशर्रफ मार्च 2016 पासून विदेशाच्या दौऱ्यावर आहेत.

हे ही वाचा...

मंदावलेल्या अर्थव्यवस्थेच्या “दुष्काळात”, सामाजिक, राजकीय असंतोषाचा “तेरावा” महिना

पुण्यात महाविकास आघाडीसह मनसेचा हंडा मोर्चा

CAA आणि NRC च्या विरोधात रबीहाचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत सुवर्ण पदक घेण्यास नकार

या विशेष न्यायालायाची सुनवाई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ करत आहे. यामध्ये सिंध उच्च न्यायालय चे न्यायाधीश नज़र अकबर आणि लाहौर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शाहिद करीम यांचा समावेश आहे.

परवेज मुशर्रफ यांच्या काळात भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्ध झाले होतं. यामध्ये पाकिस्तान ने भारतामध्ये सैनिक घुसवलं होतं. या सर्व युद्धाची रणनिती परवेज मुशर्रफ यांची असल्याचं बोललं जातंय.

Similar News