मराठा आंदोलकांवर पुन्हा लाठीचार्ज करणार का ? जरांगे पाटील यांचा सरकारला सवाल

अंतरवली सराटी - मुंबईमध्ये मराठा समाजाकडून 20 जानेवारीपासून पुन्हा आरक्षणासाठी आंदोलन, अमरण उपोषण हे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुकारण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांमध्ये काही माणसं घुसवून हे आंदोलन वेगळ्या वळणावर नेण्याचा डाव सरकारचा आहे. अशी माहिती मला सरकारमधीलच काही लोकांनी आणि कर्मचाऱ्यांनी दिली आहे. आणि यानंतर सरकार पुन्हा लाटीचार्ज करणार आहे का? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे.

Update: 2024-01-16 13:49 GMT

सरकार लोकांचे ट्रॅक्टर का मोजत आहे? सरकारने मराठा आरक्षणावर तोडगा निघावा या साठी बैठका घेतल्या का? मुंबईत येणाऱ्या मराठा समाजाला तुम्ही का अडवणार? केंद्र सरकार आणि राज्यसरकारला मराठे का नको आहेत? मराठे करत असलेली शांततेची आंदोलन सरकारला का नको आहेत? असे सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारलेत.

गेल्या काही काळामध्ये कुणबी नोंदी सापडलेल्या किती लोकांना आपण प्रमाणपत्र दिलेले आहे? असा सवाल करत जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली व सरकार मधीलच काही मंत्री हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत आणि त्यांची अशी इच्छा आहे की मराठा यांना आरक्षण मिळू नये. काही लोक माझ्यावर ट्रॅप लावून आहेत माझ्यावर डाव टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अशी माहिती देखील मला मिळत आहे आणि हे मी खूप जबाबदारीने बोलत आहे. 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये मराठा समाजाचे आंदोलन होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे आपली भूमिका मांडत असताना त्यांनी सरकारवर टीका केली व संबंधित प्रश्न विचारले.

Tags:    

Similar News