शेतकऱ्यांना आता वर्षाला 6 हजारांपेक्षा पण जास्त पैसे मिळणार का? सरकार खुशखबर देणार का?

Update: 2024-01-29 12:21 GMT

2024 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर व्हायला आता फक्त 3 दिवस बाकी उरले आहेत. निवडणूकीचे वर्ष असल्याने बजेटच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. सरकारच सर्व लक्ष अन्न, घर, नोकरी आणि शेतकऱ्यावर असेल. हे अंतरिम बजेट आहे, त्यामुळे रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी आणि महागाई रोखण्याच्या उपायोजना जनतेला अपेक्षित आहेत. बजेटमध्ये सरकार या बद्दल मोठ्या घोषणा करु शकते. रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकारला काही महत्त्वाची पावल उचलावी लागतील. दरवर्षी लाखो युवा वर्कफोर्सचा भाग बनतायत. त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण हे बजेटमध्ये सरकारसमोर आव्हान असेल.


संचारबंदीचा काळ संपल्यानंतर खाण्या-पिण्याच्या पदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. खासकरुन डाळी आणि तेलाच्या किंमती. घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सरकारने दोन-अडीच महिन्यापूर्वी ही किंमत कमी केली होती. पण हे पुरेस नाहीय. ही किंमत आणखी कमी होणं आवश्यक आहे. आम आदमीच्या इनकमचा जास्त भाग खाण्या-पिण्यावर खर्च होतोय. त्यामुळे खाद्य-पदार्थांच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी ठोस उपायोजना हवी. अर्थमंत्री त्या दृष्टीने काही पावल उचलतील अशी अपेक्षा आहे. अभ्यासक अर्थतज्ज्ञांच्या मते 1 फेब्रुवारीला काही महत्त्वपूर्ण घोषणा होऊ शकतात. शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले जातात, ती रक्कम आता 50 टक्क्याने वाढवून वार्षिक 9 हजार रुपये केली जाऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

Tags:    

Similar News