गांधी, सावरकर यांच्याविरोधातील बोललेलं खपवून घेणार नाही - देवेंद्र फडणवीस

Update: 2023-07-30 09:43 GMT

‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे प्रमुख मनोहर भिडे यांनी अमरावती येथील एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. यामुळे राज्यभारात त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. यावरु राज्याचं राजकारण ही चांगलंचं तापवलं आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यंमत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधी असो की स्वातंत्र्यवीर सावरकर असो कुणाबद्दल आम्ही खपवून घेणार नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे.

दरम्यान फडणवीस यांनी "संभाजी भिडे गुरुजी यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी निषेध करतो... महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत, स्वातंत्र्याच्या इतिहासात महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अशा महानायकाबद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य अनुचित आहे. संभाजी भिडेच काय कोणीच कोणीच असे वक्तव्य करू नये... करोडो लोकांचा अशा वक्तव्यामुळे निश्चितपणे लोकांमध्ये संताप तयार होतो... लोक महात्मा गांधीच्या विरुद्ध बोललेलं कधीही सहन करणार नाही. राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल. असं गृहमंत्री फडणवीस म्हणाले आहेत तर महात्मा गांधी असो की स्वातंत्र्यवीर सावरकर असो कुणाबद्दल आम्ही खपवून घेणार नाही". असही ते म्हणाले.

सध्याच्या राजकीय परिस्थीतीवर बोलताना फडणवीस म्हणाले की की " संभाजी भिडे गुरुजींचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांची स्वतःची संघटना चालवतात. याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा काही कारण नाही. ज्या पद्धतीने या वक्तव्याचा काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरत आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल गल्लीछ शब्दात राहुल गांधी बोलतात. त्याचाही निषेध कॉंग्रेसवाल्यानी केला पाहिजे. त्यावेळी मात्र ते मिंदे होतात". असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे. ते म्हणाले की कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधीचा अपमान सहन केला जाणार नाही. असेही फडणवीस म्हणालेत.

Tags:    

Similar News