केंद्रीय मंत्री नारायण राणे अलीबाग पोलिसांसमोर हजर राहणार?

Update: 2021-08-30 04:26 GMT

रायगड: नारायण राणे यांना 24 ऑगस्ट रोजी काही अटी शर्ती महाड कोर्टाने जामीन दिला होता. त्या ऑर्डरमध्ये महिन्यातुन दोनवेळा अलिबाग पोलिसांकडे हाजिरी लावण्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार 30 ऑगस्ट रोजी म्हणजे नारायण राणे यांना हजेरी लावावी लागणार आहे.



 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 23 ऑगस्ट रोजी महाड येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याच वक्तव्यावरुन त्यांना महाड एमआयडीसी पोलिसांनी संगमेश्वर येथून ताब्यात घेतलं होते. 24 तारखेला त्यांना अटक झाली. त्यानंतर महाड दिवाणी कोर्टात त्यांना हजर करण्यात आले. त्यांना काही अटी-शर्तींवर मंजूर करण्यात आला आहे. परंतु या अटीशर्तीचे पालन करून नारायण राणे आज अलिबाग पोलिसांकडे हजेरी लावतात का हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News