आझाद मैदानावरच जाणार; मनोज जरांगे पाटलांचा निर्णय ठाम

Update: 2024-01-25 10:23 GMT


पुणे: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा ताफा आता मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. त्यांचा रात्रीचा मुक्काम वाशी येथे होणार आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचा गर्दी टाळता येईल या हेतूने मुंबईकडे जाणारा मार्ग पोलीसांनी बदलला आहे, त्यांना पुणे मुंबई मार्गावरील जुन्या घाटातून जाण्याची सुचना दिलेली आहे.

तसेच मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर पाच हजार लोकसंख्य मर्यादा असल्यामुळे आंदोलन करू नये अशी नोटीस सुद्धा मुंबई हायकोर्टाच्या वतीने देण्यात आली असून त्यांना आझाद मैदानावर येण्यास नाकारले आहे.

जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर ठाम आहेत, सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र गृह खात्याने अधिकची सुरक्षा म्हणून पोलीस यंत्रणा तसेच लष्करी तुकडी तैनात केलेली आहे.

Tags:    

Similar News