बैलगाडा शर्यतः महाराष्ट्राला वेगळा न्याय का? अमोल कोल्हे यांचा सवाल

Update: 2021-12-15 14:44 GMT

राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली. राज्य सरकारच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली. या याचिकेवरील सुनावणी गुरूवारी पुन्हा होणार आहे. बैलगाडा शर्यतींना आंध्रप्रदेश, तामिळनाडूमध्ये परवानगी असताना महाराष्ट्रालाच का डावलेले जाते, असा युक्तिवाद करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. राज्यांच्या सीमांमुळे बैलांमध्ये कसा फरक पडू शकतो, असाही मुद्दा मांडला गेला. ही सुनावणी हंगामी निकालासाठी आहे, पण ५ सदस्य खंडपीठापुढे सुनावणी होत नाही, तोपर्यंत अंतिम निकाल लागणार नाही, अशीही माहिती कोल्हे यांनी दिली.


Full View

Tags:    

Similar News