वडेट्टीवार काफी है?

Update: 2021-06-05 09:57 GMT

विजय वडेट्टीवार महाविकास आघाडी सरकारमधील कॅबीनेट मंत्री. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या ते त्यांच्या "18 जिल्ह्यातील लॉकडाऊन उठणार" या पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रीयेमुळे चर्चेत आहेत. साधारणपणे मंत्रीमंडळ बैठकीत झालेली चर्चा मंत्री माध्यंमासमोर सांगत नसतात. मात्र, वडेट्टीवार यांनी जी माहिती माध्यमांना द्यायची नव्हती, ती देखील देऊन टाकली. त्यानंतर जे काही झालं ते सर्वांना माहितीच आहे.

पण, काहीतरी बोलून नंतर त्यावर सारवासारव करण्याची वडेट्टीवारांची ही पहिलीच वेळ नाहीय. या अगोदर वडेट्टीवारांनी सरकारला अडचणीत आणलं आहे.

1, MPSC परिक्षा वाद

पुण्यात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोर्चा सर्वांना आठवतच असेल. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे MPSC च्या परिक्षा पुढे ढकलाव्यात असं आपत्ती निवारण विभागाकडून राज्य लोकसेवा आयोगाला कळवण्यात आलं. 14 मार्चला होणारी परीक्षा पुढं ढकलल्याचा निर्णय दोन दिवस अगोदर घेतल्याने या निर्णयाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले.

हा वाद तापत असतानाच आपत्ती निवारण विभागाचे मंत्री असलेल्या वडेट्टीवारांनी "हा माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे." असं बोलून नवा वाद निर्माण केला.

2. साधुंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत

विजय वडेट्टीवार यांनी साधू हे मनोरुग्ण आहेत व साधुंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत. असे वादग्रस्त विधान केले होते. तसेच महाराष्ट्राला संतांची संस्कृती लाभलेली आहे. महाराष्ट्र संतांच्या शिकवणीवर उभा राहिला. संत व साधू हे वेगवेगळे आहेत. संत हे समाजासाठी समर्पित आहेत. संत हा समाजाचा दिशादर्शक आहे, पण हे साधू लुबाडणारे असतात, असं वडेट्टीवार म्हणाले होते. यावरुन भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी वडेट्टीवार यांच्यावर कडाडून टीका केली होती.

सध्या वडेट्टीवार यांच्याकडे मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटके विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय कल्याण, खार जमीन विकास, आपत्ती व्यवस्थापन या महत्वाच्या विभागांची जबाबदारी आहे.

मात्र, ठाकरे सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांची वक्तव्ये बघता महाविकास आघाडी

सरकारमधील गोंधळ स्पष्टपणे दिसून येतो...

Tags:    

Similar News