देवेंद्र फडणवीस का होत आहेत ट्रोल?

Update: 2020-05-01 09:19 GMT

सोशल मीडियाचा सगळ्यात जास्त आणि चांगला वापर भाजपने केल्याचे सांगितले जाते. पण आता हेच सोशल मीडियाचं अस्त्र भाजपवर उलटतंय की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नेटिझन्सच्या रागाचा सामना करावा लागत असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांनी सोशल मीडियावर काहीही पोस्ट टाकली तरी त्यांच्यावर नेटिझन्स मोठ्या प्रमाणात टीका करताना दिसत आहेत.

फड़णवीस यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर प्रतिक्रिया देताना सध्या नेटिझन्स मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत असल्याचं तर फडणवीस हे राजकारण करत असल्याची मतं व्यक्त करत आहेत.

 

दरम्यान आता फडणवीस यांच्याबाबत होणाऱ्या या ट्रोलिंगची भाजपने गंभीर दखल घेत पोलिसात तक्रार केली आहे. देवेंद्र फडणवीस सोशल मीडियामध्ये ट्रोल करणे, आक्षेपार्ह अश्लील, घाणेरडी, व्यंगचित्रे पोस्ट करणे यासंदर्भात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नुकतीच पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली आहे.

Similar News