कोरोनाबाबत अचूक माहिती मिळवा थेट WHO कडून

Update: 2020-04-03 12:12 GMT

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) कोरोना व्हायरसला जागतिक संकट म्हणून जाहीर केलं आहे. यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेनं या संकटाबाबत जगभरातील नागरिकांना कोरोनाबाबत ताजी माहिती देण्यासाठी एक खास पाऊल उचललं आहे.

राकुटेन व्हायबर या मेसेंजर एपच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य संघटनेनं एक चॅटबोट सुरू केले आहे. विविध भाषांमध्ये सुरू करण्यात आलेल्या चॅटबोटमुळे आता नागरिकांना अचूक माहिती मिळवता येणार आहे. राकुटेन व्हायबरचं नेटवर्क मोठे असल्याने सुमारे १ कोटी लोकांपर्यंत त्यांच्या स्थानिक भाषेत पोहोचणं जागतिक आरोग्य संघटनेला शक्य होणार आहे.

WHO Viber Chatboat एकदा सबक्राईब केल्यानंतर वापरकर्त्यांना थेट जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनाबाबतच्या ताज्या बातम्या आणि माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर सध्या कोरोनाबाबत फवांचे पेव फुटले असतांना वापरकर्त्यांना कोरोनापासून बचावाबाबतची योग्य माहिती प्रश्न उत्तरच्या माध्यमातून किंवा परस्पर संवादातून मिळणार आहे. चॅटबोट हे एप मोफत असून शुक्रवारी ते इंग्लिश, रशियन, अरेबिक या भाषांसह २० भाषांमध्ये सुरू करण्यात आले.

Similar News