भारतीय कोरोना अवताराचे WHO कडून नामकरण

जवळपास 44 पेक्षा जास्त देशांमधे हातपाय पसरलेल्या कोरोना भारतीय अवतारांचे जागतिक आरोग्य संघटनेने आता नामकरण केलं आहे.

Update: 2021-06-03 12:31 GMT

भारतात सापडलेला B.1.617.1 हा कोरोना व्हेरिएंट 'कप्पा' आणि B.1.617.2 हा व्हेरिएंट आता 'डेल्टा' या नावाने ओळखला जाणार आहे. हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या 44 हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे. काही दिवसांपूर्वी भारत सरकारने या व्हेरिएंटचा उल्लेख इंडियन व्हेरिएंट असा करायला सोशल मीडिया कंपन्यांना बंदी आणली होती. 


ग्रीक अल्फाबेट्सवरुन नामकरण

कप्पा आणि डेल्टा ही दोन नावं ग्रीक अल्फाबेट्सवरुन देण्यात आली आहेत. या आधीच्या अनेक व्हेरिएंटना ग्रीक अल्फाबेट्सची नावं देण्यात आली आहेत. या मालिकेतील पहिला व्हेरिएंट हा ब्रिटनमध्ये सापडला होता, त्याला जागतिक आरोग्य संघटनेने 'अल्फा' असं नाव दिलं आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या व्हेरिएंटला 'बीटा' असं नाव देण्यात आलं तर ब्राझिलमध्ये सापडलेल्या व्हेरिएंटला 'गॅमा' अस नाव देण्यात आलं होतं. 

दहा दिवसांपूर्वी केंद्र सरकारने भारतातील कोरोना व्हायरससाठी इंडियन व्हेरिएंट हा शब्द वापरण्यास सोशल मीडिया कंपन्यांना बंदी आणली होती. सोशल मीडिया कंपन्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवरुन इंडियन व्हेरिएंट हा शब्द काढून टाकावा असा आदेश केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिला होता. इंडियन व्हेरिएंट या शब्दाच्या वापरामुळे चुकीची माहिती आणि संदेश जातो, तसेच या शब्दामुळे देशाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे यापुढे इंडियन व्हेरिएंट या शब्दाचा वापर करु नये असा

आदेश माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने दिला होता.

 

संपूर्ण जग सध्या कोरोना महासाथीचा सामना करतंय. या महासाथीमध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी आपले प्राण गमवले आहेत. प्रत्येक वेळी कोरोनाचा विषाणू आपल्या जणूकांमध्ये बदल करतोय. याच कारणामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड होऊन बसले आहे. सध्या कोरोनाचा B.1.617 नावाचा नवा विषाणू (नवा व्हेरियंट) समोर आला आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने सविस्तर माहिती दिली आहे. या विषाणूबद्दल माहिती देताना WHO ने तब्बल 32 पाणी दास्तऐवज तयार केलाय. ज्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने B.1.617 हा कोरोनाचा नवा विषाणू तब्बल 44 देशांमध्ये आढल्याचे सांगितले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या B.1.617 या नव्या रुपाबद्दल माहिती दिल्यानंतर संपूर्ण जगामध्ये खळबळ उडाली आहे. अनेक माध्यमांनी B.1.617 या कोरोनाच्या नव्या रुपाला 'कोरोनाचा भारतीय व्हेरियंट' असं संबोधलंय. मात्र, याच गोष्टीवर भारत सरकारने आक्षेप घेतलाय. भारत सरकारने जागितक आरोग्य संघटनेने आपल्या 32 पानी माहितीमध्ये कोरोनाचा B.1.617 हा व्हेरियंट भारतीय असल्याचे कोठेही नमूद केलेले नाही. तसेच WHO ने दिलेल्या माहितीमध्ये B.1.617 व्हेरियंट फक्त भारतच नाही तर जगातील बऱ्याच देशांमध्ये पसरल्याचे सांगितले आहे. एकूण 44 देशांमध्ये हा कोरोनाचा नवा विषाणू आढळला आहे. त्यामुळे हा भारतीय व्हेरियंट आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीमध्ये B.1.617 हा व्हेरियंट हा कोरोनाच्या पहिल्या विषाणूपेक्षा जास्त घातक आहे, असं सांगण्यात आलंय. तसेच या विषाणूचा संसर्ग पहिल्या विषाणूच्या तुलनेत लवकर आणि सहज पद्धतीने होऊ शकतो, असंसुद्धा WHO ने सांगितलंय. B.1.617 विषाणूच्या याच गुणधर्मामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या वाढत आहे. लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाच्या B.1.617 या नव्या व्हेरियंटवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असेसुद्धा जागितक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

राज्यात काल 14,123 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज 477 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा 1.67 टक्के एवढा झालाय. राज्यात आज 14,123 नवीन रुग्ण सापडल्यानंतर आज रोजी एकूण 2,30,681 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57,61,015 झालीय. देशात आज अखेर 335,114 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून राज्यातील मृतांची संख्या 94,844 झाली आहे.

Tags:    

Similar News