पूरपरिस्थितीला कोण जबाबदार?

Update: 2019-08-09 17:01 GMT

- धरणांमध्ये पाण्याची पातळी वाढायला 1 आणि 2 ऑगस्ट पासून वाढायला लागली होती.

- बॅकवॉटर किंवा धरणक्षेत्रात अतिवृष्टी थांबली नव्हती.

- हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा खरा ठरला. अद्यापही अतिवृष्टीचा इशारा कायम आहे.

- धरणांमधल्या पाण्याचं व्यवस्थापन हा सुद्धा पूर स्थितीवर नियंत्रणाचा योग्य मार्ग असतो. आंतरराज्यीय मुद्दा असल्याने आपल्या धरणांमधून होत असलेला विसर्ग आणि खालच्या धरणांमधून होत असलेला विसर्ग याचं योग्य नियोजन झालं नाही.

- या नियोजनासंदर्भात दोन राज्यांमध्ये सहसा मुख्यमंत्री पातळीवर चर्चा होते.

- मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 7 आणि 8 तारखेपासून सुरू झाला.

सातारा-सांगली-कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरासाठी निसर्गदत्त कारणांसोबतच प्रशासकीय दिरंगाई, राजकीय निर्णयप्रक्रीयेत झालेला विलंब अशा बाबी ही सामील आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची जबाबदारी निश्चित करणेही आवश्यक असल्याचं मत मुख्यमंत्री कार्यालयात काम करण्याचा अनुभव असलेल्या एका माजी सनदी अधिकाऱ्याने व्यक्त केलं आहे.

 

- रवींद्र आंबेकर

Similar News